
हाऊसफुल या चित्रपटाचे चार भाग पूर्वी आले आणि या चारही भागांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांनी चांगली कमाई केली आणि ही एक यशस्वी फ्रॅचाईजी मानली गेली. त्यामुळे निर्माते साजिद नाडियादवाला यांनी या चित्रपटाचा पाचवा भाग आता आणलेला आहे. विशेष म्हणजे या पाचव्या भागामध्ये चित्रपटाचे क्लायमॅक्स दोन ठेवण्यात आलेले आहेत. 'हाऊसफुल ५ ए' आणि 'हाऊसफुल पाच बी' अशा नावाने हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.