
मुलाखतकार- भूमिका सावंत
महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे नाव इतिहासामध्ये आदराने घेतले जाते. अशा या लढवय्या आणि धैर्यशील राणीची शौर्यगाथा आता ‘धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर - एक युग’ या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर येत आहे. हा चित्रपट येत्या २३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती लयभारी प्रोडक्शनच्या बॅनरखाली सोमनाथ शिंदे यांनी केली असून, नितीन धवने पाटील या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. सुशांत सोनवले यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून दिग्दर्शन त्यांनीच केले आहे. या चित्रपटात महाराणी अहिल्यादेवींची भूमिका अभिनेत्री अश्विनी महांगडे साकारीत आहे. या निमित्त तिच्याशी साधलेला संवाद...