

RINKU RAJGURU
ESAKAL
'सैराट' चित्रपटातून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने मराठीसोबतच हिंदीमध्येही आपलं नशीब आजमावलं. तिने बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री लारा दत्ता हिच्यासोबत स्क्रिन शेअर केलेली. ती लारा दत्तासोबत 'हंड्रेड' या वेब सीरिजमध्ये दिसली. २०२० मध्ये ही सीरिज आली होती. यात रिंकूने नेत्रा पाटीलची भूमिका साकारली होती. तर लारा दत्ता एसीपी सौम्या शुक्लाच्या भूमिकेत होती.आता एका मुलाखतीत रिंकूने तिचा अनुभव सांगितला आहे.