
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये निर्माते व दिग्दर्शक नेहमीच निरनिराळे प्रयोग करीत असतात. त्यांच्या या वेगळ्या प्रयोगाचे प्रेक्षकांकडून स्वागत केले जाते तर कधी कधी त्यांचा हा प्रयोग फसतोही. पण तरीही त्यांच्या या धाडसाचे कौतुक करावेच लागेल. आता असेच धाडस दिग्दर्शक केदार शिंदेने केले आहे आणि त्याच्या या धाडसाचे कौतुक निश्चित करावे लागेल. त्याच्या आता प्रदर्शित झालेल्या 'झापुक झुपूक' या चित्रपटामध्ये त्याने बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणला ब्रेक दिला आहे.