
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानिस हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. ती छोट्या पडद्यावरील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींनपैकी एक आहे. तिची लोकप्रियता प्रचंड आहे. तिच्या चाहत्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. मृणालने 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यातील ती सुंदर, निरागस शमिका सगळ्यांनाच भावली होती. त्यानंतर मृणालने मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर तिने केलेली प्रत्येक मालिका हिट ठरली. आता एका मुलाखतीत तिने तिला पहिल्या मालिकेसाठी किती पगार मिळाला होता याचा आकडा सांगितलाय.