
विकी कौशल हा त्याच्या भूमिकांसाठी ओळखला जातो. विकीने त्याच्या करिअरमध्ये अनेक चित्रपट केले. मात्र त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली ती 'उरी' आणि 'छावा' या चित्रपटामुळे. 'छावा' या चित्रपटाने तर कमाईचे अनेक रेकॉर्ड तोडले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. २०१५ मध्ये 'मसान' चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या विकीने आतापर्यंत अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यात साम बहादूर, उरी: द सर्जिकल स्ट्राइक, बॅड न्यूजसारखे चित्रपट आहेत. आज विकीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्या संपत्तीबद्दल.