
भारतीय चित्रपटसृष्टीतील बहुप्रतीक्षित सुपरहिरो फ्रँचायझी क्रिश चा पुढचा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 'क्रिश ४' ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'क्रिश ४' ची निर्मिती आदित्य चोप्रा राकेश रोशन यांच्यासोबत करतील आणि २०२६ च्या सुरुवातीला हा चित्रपट प्रदर्शित होईल. इतकंच नाही. आता या चित्रपटाबद्दल एक मोठी बातमी समोर येतेय. 'हृतिक 'क्रिश ४' मध्ये अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून काम करणार आहे. या चित्रपटात तो दुहेरी भूमिका साकारणार आहे.