
२००० मध्ये 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून हृतिक रोशनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तो त्याच्या पहिल्याच चित्रपटाने रातोरात स्टार झाला. आणि या वर्षी त्याच्या इंडस्ट्रीतील प्रवासाला २५ वर्षे पूर्ण झाली. १० जानेवारी रोजी हृतिकचा 'कहो ना प्यार है' हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाला. मात्र जेव्हा हा चित्रपट २५ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला तेव्हा हृतिकने स्वतःला कोंडून घेतलेलं. त्याचं कारणही त्याने एका मुलाखतीत सांगितलं.