Film Review : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘आय मॅटर’मध्ये रोमा समाजातील रेबेकाचा संघर्ष; सामाजिक भेदभावाच्या चक्रातून स्वतःची ओळख निर्माण करण्याची भावस्पर्शी कहाणी

I Matter Movie Review | Goa International Film Festival Romanian Film : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झालेला रोमानिया, जर्मनी आणि बेल्जियम निर्मित ‘आय मॅटर’ चित्रपट रोमा समाजातील किशोरवयीन मुलीचा संघर्ष, सामाजिक भेदभाव, अस्तित्वाची ओळख आणि स्वप्नांसाठीच्या धडपडीचे प्रभावी चित्रण करतो.
I Matter Movie Review | Goa International Film Festival Romanian Film

I Matter Movie Review | Goa International Film Festival Romanian Film

esakal

Updated on: 

जयदीप पाठकजी

अनाथाश्रम, तुरुंग, बेघरांसाठीचे निवारा केंद्र आणि उच्चभ्रू नाट्यशाळा... जगण्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर माणसाला सामोरे जावे लागणारे संघर्ष, सामाजिक विषमता आणि व्यवस्थेचा निर्दयी चेहरा यांची गुंफण म्हणजे ‘आय मॅटर’ हा चित्रपट. रोमानियातील रोमा समाजातील रेबेका या किशोरवयीन मुलीचा प्रवास या चित्रपटातून उलगडतो. गरिबी, सामाजिक उपेक्षा आणि भेदभावाच्या चक्रात अडकलेल्या रेबेकाला स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. मात्र, स्वप्नांच्या दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल तिला एका नव्या संघर्षासमोर उभे करते. ‘माझेही अस्तित्व महत्त्वाचे आहे’, ही जाणीव करून देणारा चित्रपट म्हणून ‘आय मॅटर’ लक्ष वेधून घेतो.

Loading content, please wait...