
मराठी सिनेसृष्टी असो किंवा बॉलिवूड असो इथे कधी कुणाचं नाव कुणासोबत जोडलं जाईल याचा काहीही नेम नाही. बऱ्याचदा निखळ मैत्रीला देखील प्रेमाचं नाव दिलं जातं. मराठमोळी अभिनेत्री मुक्ता बर्वे हिच्यासोबतही असंच काहीसं घडलं. मुक्ता आणि लोकप्रिय दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्या मैत्रीला अफेअर म्हटलं गेलं. त्यांचं नाव एकत्र जोडलं गेलं. मात्र त्यावर पत्नीने दिलेल्या प्रतिक्रियेने सगळंच चित्र बदललंय.