

tharla tar mag new episode
esakal
'ठरलं तर मग' मालिकेत आता मोठा ट्विस्ट येणार आहे. छोट्या पडद्यावरील ही मालिका गेले काही वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. त्यात मालिकेत वेगवेगळे प्लॉट ट्विस्ट येतायत. त्यामुळेच ही मालिका प्रेक्षकांची आवडती आहे. सोबतच गेले दोन वर्ष ही मालिका टीआरपी यादीत प्रथम क्रमांकावर आहे. सध्या मालिकेत नागराज आणि महीपतचं सत्य सुमन समोर आलंय. ती हे सत्य सायलीला सांगणार आहे. मात्र त्यापूर्वीच तिचं काही बरं वाईट तर होणार ना अशी शंका प्रेक्षकांना आहे. तर दुसरीकडे सचिनचं सत्य अस्मितासमोर येणार आहे.