
‘इंडियन आयडल 12’ चा विजेता गायक पवनदीप राजन याचा मे महिन्यात भीषण अपघात झालेला
या घटनेनंतर त्याच्या चाहत्यांमध्ये टेन्शनचे वातावरण होते
पण आता त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती समोर आली आहे
‘‘इंडियन आयडल 12’’ चा विजेता आणि उत्तराखंडचा सुपरस्टार गायक पवनदीप राजन याने मे 2025 मध्ये झालेल्या भीषण कार अपघातानंतर प्रथमच एका कार्यक्रमात हजेरी लावली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पवनदीपने दीर्घ उपचारानंतर आता तब्येतीत सुधारणा होत असल्याची दिलासादायक माहिती दिली आहे. चाहत्यांना त्याच्या पुनरागमनाने आनंदाची लाट उसळली आहे.