

indrajal
esakal
रहस्य, थरार, पौराणिक कथा आणि गुप्त खजिन्याचा शोध याचा एक अनोखा संगम असलेला ‘इंद्रजाल’ हा चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीस येत आहे. भारताचा समृद्ध इतिहास आणि संस्कृतीशी जोडलेला हा चित्रपट भारतीय पौराणिक कथांमधील निळावंतीशी संबंधित गूढ रहस्य आणि जंगलातील रोमांचक साहसावर आधालेला सिनेमॅटिक असा हा चित्रपट प्रत्येकाला खिळवून ठेवणारा आहे. ‘शिवरत्न प्रॉडक्शन’ने नुकतीच 'इंद्रजाल' या त्यांच्या पहिल्या हिंदी चित्रपटाची घोषणा केली. आता या चित्रपटाचं मोशन पोस्टर आणि फर्स्ट लूक समोर आलं असून ते सिने-रसिकांमध्ये कमालीची उत्सुकता वाढवणारं आहे.