‘चॅनेलमधल्या कुणाचातरी राग...’ दयाने सांगितलं CID बंद होण्याचं खरं कारण; म्हणाला-

WHY CID SERIAL CLOSED SUDDENLY: सीआयडी हा कार्यक्रम अचानक बंद करण्यात आला. त्यानंतर प्रेक्षकांच्या म्हणण्यावरून पुन्हा सुरू करण्यात आला. मात्र तो बंद का झाला यामागचं कारण आता समोर आलंय.
WHY  CID GET CLOSED

WHY CID GET CLOSED

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावर असे अनेक कार्यक्रम आहेत ज्यांनी अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यातलाच एक कार्यक्रम म्हणजे सीआयडी. हिंदी वाहिनीवरील या शोने प्रेक्षकांना एका वेगळ्या जगाची ओळख करून दिली. त्यातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. एसीपी प्रद्युमन, अभिजित, दया यांसारखी पात्र आजही लोकांच्या लक्षात आहेत. आजही हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. मात्र काही वर्षांपूर्वी मधेच या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. तेव्हा चाहत्यांना धक्का बसला होता. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या मालिकेतील दयाची भूमिका साकारणाऱ्या दयानंद शेट्टी यांनी त्यामागचं कारण सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com