

irfan khan
esakal
इरफान खान हे नाव घेतलं की चाहत्यांच्या चेहऱ्यावर एक हसू उमटतं. त्यांचे चित्रपट आपोआपच आठवतात. बॉलिवूडच्या या कलाकाराची वेगळी अशी ओळख करून देण्याची गरज नाही. ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘पानसिंग तोमर’, ‘द लंचबॉक्स’, ‘हैदर’, ‘गुंडे’, ‘पिकू’, ‘तलवार’, ‘हिंदी मीडियम’ यांसारख्या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मात्र या प्रवासातच त्यांना कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचं निदान झालं आणि त्यांनी २९ एप्रिल २०२० रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र आजही त्यांच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत. 'अंग्रेजी मिडीयम' हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला. आता या सिनेमाच्या कॉस्ट्यूम डिझायनरने त्यांच्या शेवटच्या दिवसांबद्दल सांगितलंय.