
ज्येष्ठ निर्माते व दिग्दर्शक महेश भट यांचा सहायक असलेल्या मोहित सुरीने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये यशस्वी वाटचाल केली आहे. 'मर्डर २', 'एक व्हिलन', 'आशिकी २' अशा काही यशस्वी चित्रपटांचा दिग्दर्शक म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. 'आशिकी २' या चित्रपटामुळे त्याला चांगलेच स्टारडम प्राप्त झाले. आता त्याचा 'सैयारा' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यशराज बॅनर्सची निर्मिती असलेला हा चित्रपट रोमान्स, संगीत आणि विविध भावभावनांचे उत्तम मिश्रण असलेला आहे. या चित्रपटाद्वारे अनन्या पांडेचा चुलतभाऊ अहान पांडे तसेच अनीत पड्डा हे दोन नवीन चेहरे पदार्पण करीत आहेत. चित्रपटाची कथा या दोन नव्या चेहऱ्यांभोवती फिरणारी आहे.