
छोट्या पडद्यावरील अनेक मालिका प्रेक्षकांच्या मनात कायमच्या कोरल्या जातात. या मालिकांमधील पात्र यातील कथा, कलाकार सगळंच प्रेक्षकांच्या मनात कायम राहतं. अशीच एक मालिका म्हणजे झी मराठीवरील 'लागीरं झालं जी'. या मालिकेतील अनेक कलाकार सधया वेगवेगळ्या मालिकांमध्ये काम करताना दिसतायत. मात्र त्यांची ओळख ही 'लागीरं झालं जी या मालिकेनेच होते. किरण गायकवाड पाठोपाठ आता या मालिकेतील आणखी एक अभिनेता लग्नाचं मनावर घेणार असं दिसतंय.