
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' प्रेक्षकांच्या मनावर अजूनही राज्य करतेय. या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. ही मालिका गेल्या १७वर्षांपासून अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेत दररोज नवीन काहीतरी असतं. तर वेगवेगळ्या कथा आणि वेगवेगळी पात्र यांच्यामुळे गेली १७ वर्ष अखंडपणे ही मालिका सुरू आहे. या मालिकेतील जेठालाल, चंपकचाचा, टप्पूसेना, भिडे यांसारखी अनेक पात्र प्रेक्षकांची आवडती आहेत. त्यातलंच एक पात्र म्हणजे माधवी भाभी. मात्र प्रेक्षकांची आवडती माधवी भाभी ही चेन स्मोकर असल्याचं बोललं जातंय. याबद्दल स्वतः सोनालीने हिने सांगितलं आहे.