
शाहिद कपूरचा सावत्र भाऊ आणि बॉलिवूड अभिनेता ईशान खट्टर हा सिनेसृष्टीचा नवा चेहरा आहे. त्याने काही उत्तम भूमिका साकारल्या आहेत. त्याने 'होमबाउंड' या चित्रपटात काम केलंय. या सिनेमाचा प्रीमियर कान्समध्ये करण्यात आला. यात जान्हवी कपूर आणि विशाल जेठवाही मुख्य भूमिकेत दिसत आहेत. करण जोहरच्या या सिनेमाचं कौतुकही झालं. यापूर्वी ईशान 'अ सुटेबल बॉय' या सीरिजमध्ये झळकला होता. यात त्याने चक्क २४ वर्षांनी मोठ्या असलेल्या तब्बूला किस केलेलं. त्यांचे सिन चांगलेच व्हायरल झाले होते. आता अभिनेत्याने त्यावर भाष्य केलंय.