

JAHNAVI KILLEKAR
ESAKAL
'भाग्य दिले तू मला', 'आई तुळजाभवानी', ''बिग बॉस मराठी' मधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. जान्हवीने नुकताच स्वतःचा कपड्यांचा ब्रँड सुरू केलाय. ज्याची सुरुवात तिने सिद्धिविनायकाच्या दर्शनाने केलेली. अनेक गाण्यांमधून आणि व्हिडिओंमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी जान्हवी सध्या तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. आपण ९२ किलोचे होतो आणि तब्बल ४२ किलो वजन कमी केलंय असं वक्तव्य तिने केलंय. सोबतच तिने हे कसं केलं याबद्दलही सांगितलं.