
दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत यांच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. रजनीकांत यांच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे. फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात रजनीकांत यांचे चाहते आहेत. त्यांचा 'जेलर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं होतं. त्यानंतर 'जेलर २' येणार का याबद्दल चर्चा सुरू झालेली. आता या चर्चांना पूर्णविराम लागलाय कारण अखेर 'जेलर २' ची घोषणा करण्यात आलीये. नुसती घोषणा नाही तर या चित्रपटाचा ४ मिनिटांचा प्रोमोही प्रदर्शित करण्यात आलाय.