
'लक्ष्मी निवास' ही मालिका प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसतेय. या मालिकेत एकत्र कुटुंबाची कथा दाखवण्यात आलीये. आपल्या कुटुंबासाठी प्रत्येक गोष्ट करणारे आईवडील हे आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी कसे खचता खातात हे या मालिकेत दाखवण्यात आलं आहे. सध्या या मालिकेत लग्नाचा ट्रॅक सुरू आहे. लक्ष्मी आणि निवास यांची धाकटी मुलगी जान्हवी हिचं लग्न सुरू आहे. तिचे मालिकेत खूप लाड सुरू आहेत. मात्र हिच जान्हवी खऱ्या आयुष्यातदेखील लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतंच तिचं केळवण पार पडलंय.