

२०२५ या वर्षात प्रदर्शित झालेल्या सर्वाधिक उत्तम मराठी चित्रपटांपैकी एक असलेला चित्रपट म्हणजे 'जारण'. या चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. एक आगळीवेगळी कथा यातून दाखवण्यात आली होती. अभिनेत्री अमृता सुभाष आणि अभिनेत्री अनिता दाते यांच्या उत्कृष्ट अभिनयाने सजलेला जा चित्रपट आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातो. थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर येण्यास सज्ज झालाय.