

jaran releases on tv
ESAKAL
२०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या लोकप्रिय चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे 'जारण'. 'जारण' हे नाव ऐकताच म्हणजे नक्की काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. हा चित्रपट सायकोलॉजिकल थ्रिलर होता. ६ जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. यात अमृता सुभाष, अनिता दाते-केळकर, किशोर कदम, ज्योती मालशे, राजन भिसे, सीमा देशमुख मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने प्रेक्षकांना काळ्या जादूच्या दुनियेत नेलं होतं. यातील अमृता आणि अनिता या दोघींच्याही भूमिका भाव खाऊन गेल्या होत्या. आता हा चित्रपट घरबसल्या टीव्हीवर पाहता येणार आहे.