JAVED AKHATAR ON RAHMAN
esakal
Premier
'छावा' समाजात फूट पाडणारा चित्रपट... ए. आर. रहमानच्या वक्तव्यावर जावेद अख्तर यांचा संताप; म्हणाले- काय विचार करून...
A. R . RAHMAN STATEMENT ON CHHAAVA MOVIE: ए आर रहमान याने 'छावा' चित्रपटाबद्दल केलेलं वादग्रस्त वक्तव्य सध्या चर्चेत आहे. त्यावर आता जावेद अख्तर यांनी उत्तर दिलं आहे.
लोकप्रिय संगीतकार- गायक ए आर रहमान आणि दिग्गज गीतकार जावेद अख्तर यांच्यात सध्या जोरदार जुंपली असल्याचं दिसतंय. ए आर रहमान यांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य या वादाचं कारण ठरलंय. ऑस्कर जिंकलेल्या रहमान यांनी आपल्याला गेली ८ वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम मिळत नसल्याचं सांगितलं. यामागे धार्मिक कारण असू शकतं असं ते म्हणाले. शिवाय 'छावा' हा चित्रपट धार्मिक तेढ निर्माण करणारा आहे असंही ते म्हणाले. ज्यामुळे आता जावेद यांचा राग अनावर झालाय. त्यांनी त्यांच्याच शब्दात रहमान यांना उत्तर दिलंय.

