Atlee: 'जवान'चा दिग्दर्शक ॲटलीला करायचंय कमल हासन यांच्यासोबत काम; म्हणतो, 'माझ्या मुलाला जर कधी...

Atlee On Kamal Haasan: लोकप्रिय दाक्षिणात्य दिग्दर्शक ॲटली याला आता अभिनेते कमल हासन यांच्यासोबत काम करायची इच्छा आहे.
atlee on kamal haasan
atlee on kamal haasan sakal
Updated on

ब्लॉकबस्टर दिग्दर्शक ॲटली हा सध्या भारतीय चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मागणी असलेला दिग्दर्शक आहे. शाहरुख खान, विजय सेतुपती, नयनतारा आणि दीपिका पादुकोण यांच्या ब्लॉकबस्टर 'जवान' या चित्रपटाने बॉलिवूडचा चेहरा मोहरा बदलला. हा चित्रपट ॲटलीने दिग्दर्शित केला होता. नुकताच मुंबईत शंकर आणि कमल हासन यांच्या 'इंडियन 2' चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. हा चित्रपट १२ जुलै २०२४ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या ट्रेलर लॉन्चला ॲटलीने देखील हजेरी लावली होती. त्यानिमित्ताने त्याने कमल हासन यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

या कार्यक्रमात ॲटलीने ज्येष्ठ अभिनेते कमल हासन यांचं भारतीय चित्रपटांचे बायबल असं वर्णन केलं. तो म्हणाला,'माझा मुलगा मीरला भविष्यात चित्रपटसृष्टीबद्दल जाणून घ्यायचं असेल, तर त्याला कमल हसन यांचं काम पाहावं लागेल. ते भारतीय चित्रपटांचे बायबल आणि विश्वकोश आहेत. सिनेमासाठी मी नेहमीच त्यांचा ऋणी राहीन, मला तुमच्यासोबत काम करायचे आहे, मी एक स्क्रिप्ट लिहून तुमच्याकडे येईन.'

याशिवाय शंकर आणि ॲटली यांना जोडणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ॲटलीने शंकर षणमुगम यांच्या 'एंथिरन' (2010) आणि 'नानबान' (2012) मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. कामाच्या आघाडीवर, चित्रपट निर्माता म्हणून त्याचा पुढचा चित्रपट 'बेबी जॉन' रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. आता ॲटली आणि कमल हासन पुढे कोणत्या चित्रपटासाठी एकत्र येणार हे पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. त्यांचा चित्रपट हा जगभरात ब्लॉकब्लस्टर ठरणार हे मात्र नक्की.

atlee on kamal haasan
Jagat Bhari Pandharichi Wari: पंढरीची वारी म्हणजे काय रे भाऊ? नव्याकोऱ्या गाण्यातून संदीप पाठक सांगणार वारीचा इतिहास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com