

jay bhanushali maahi vij
esakal
गेल्या काही वर्षात अनेक कपलने घटस्फोट घेतला. मराठी चित्रपटसृष्टी असो किंवा बॉलीवूड घटस्फोटाचं प्रमाण आता वाढताना दिसतंय. अनेक लोकप्रिय जोडपी एकमेकांपासून वेगळी होत आहेत. अशातच आता टीव्हीवरील आणखी एका लोकप्रिय कपलने वेगळं होत असल्याची घोषणा केलीये. यापूर्वीच त्यांच्यात सारं काही आलबेल नसल्याचं बोललं जात होतं. सुरुवातीला या अफवा आहेत असं त्यांनी म्हटलेलं. मात्र आता स्वतःच इंस्टाग्राम पोस्ट करत आपण वेगळे होत असल्याचं जाहीर केलंय. हे लोकप्रिय कपल आहे जय भानुशाली आणि माही वीज.