

jay dudhane arrest
ESAKAL
अभिनेता जय दुधाणे हा मराठी इंडस्ट्रीमधील मोठा नाव आहे. मराठीसोबतच त्याने हिंदी टेलिव्हिजनवरही आपली छाप पाडली. काही दिवसांपूर्वीच जयने हर्षदा पाटीलसोबत लग्नगाठ बांधली. मात्र आज जयला पोलिसांनी मुंबई विमानतळावरून अटक केलीये. त्याच्यावर ५ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. केवळ जयचं नाही तर त्याचे आजी- आजोबा, आई आणि बहिणीवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याच्या अटकेने चाहत्यांना एकच धक्का बसलाय. मात्र आतल्या संपूर्ण प्रकरणावर जयने त्याची प्रतिक्रिया दिलीये.