
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते जयवंत वाडकर यांनी चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. त्यांनी मराठी मालिका, नाटक आणि सिनेमा अशा तीनही माध्यमांमधून प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप पाडली. विनोदाचं अचूक टायमिंग साधत जयवंत यांनी प्रेक्षकांना हसवलं. मात्र आता हे सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यांच्या लेकीने त्यांचं नाव मोठं केलं आहे. जयवंत यांनी एक पोस्ट करत त्यांच्या लेकीचं यश चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. त्यांची लेक एका मोठ्या कंपनीची ब्रँड अँबॅसिडर झाली आहे.