
'तारक मेहता का उल्टा चश्मा' या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मनं जिंकली. गेली १२ वर्ष हा कार्यक्रम अविरतपणे छोट्या पडद्यावर सुरू आहे. त्यामुळेच गोकुळधाम सोसायटी आणि त्यातले रहिवासी प्रेक्षकांचे आवडते आहेत. जेठालाल, पोपटलाल, भिडे मास्तर, माधवी भाभी, हाथी भाई असे सगळेच प्रेक्षकांचे लाडके आहेत. कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री दिशा वकानी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. प्रेक्षक गेली पाच वर्ष दिशाची वाट पाहत आहेत. मात्र ती मालिकेत परत येण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीयेत. आता तारक मेहता मधील अभिनेत्रीने दिशा सेटवर परत आली होती असा खुलासा केला आहे.