
मोठमोठे ब्रँड कलाकारांना आपला चेहरा बनवताना दिसतात. तर अनेक सेलिब्रिटी हे वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतात. कुणाचा वाढदिवस, कुणाच्या दुकानाचं उदघाटन किंवा कुणाच्या घरातला कार्यक्रम अशा ठिकाणी हे कलाकार विशेष पाहुणे म्हणून बोलावले जातात. अशाच एका कार्यक्रमाला गेलेल्या मराठी अभिनेत्रीला मात्र धक्कादायक अनुभव आलेला. ही अभिनेत्री म्हणजे प्रगल्भा कोळेकर. प्रगल्भा ही 'आंतरपाट' या मालिकेत दिसली होती.