

jitendra joshi on kakan movie
esakal
मराठी चित्रपटसृष्टीने प्रेक्षकांना असे अनेक कल्ट क्लासिक सिनेमे दिले जे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मात्र असे काही मराठी चित्रपट आहेत जे प्रदर्शित झाले तेव्हा चालले नाहीत मात्र आता सोशल मीडियावर माऊथ पब्लिसिटीमुले प्रेक्षकांच्या गळ्यातले ताईत झालेत. असाच एक चित्रपट म्हणजे काकण. या चित्रपटाने तरुणाईला वेड लावलंय. प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या काळजात घर करून आहे. 'काकण' हे गाणं देखील नेटकऱ्यांचं आवडतं आहे. या चित्रपटातील काही सीन पाहून आजही प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू तरळतात. या चित्रपटातील अभिनेता जितेंद्र जोशी याने 'काकण'बद्दल एक खंत बोलून दाखवलीये.