John Abraham: जॉन अब्राहम गुप्तहेराच्या वेगळ्या रूपात झळकणार; ‘तेहरान’ लवकरच ओटीटीवर
Bollywood Drama: जॉन अब्राहम ‘तेहरान’ चित्रपटात एका गूढ गुप्तहेराच्या भूमिकेत झळकणार आहे. सत्य घटनांवर आधारित ही थरारक कथा १४ ऑगस्टला ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.
जॉन अब्राहम म्हटलं की डोळ्यासमोर ॲक्शन, देशप्रेम आणि जबरदस्त स्टाइल येते. आता तो ‘तेहरान’ या नव्या चित्रपटात एका गुप्तहेराच्या वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी झी५वर प्रदर्शित होतो आहे.