
'आरआरआर' या चित्रपटातून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता ज्युनिअर एनटीआर याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. तो दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील टॉप अभिनेत्यांपैकी एक आहे. मात्र सध्या त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात ज्युनिअर एनटीआर अतिशय बारीक दिसत आहे. त्याने त्याचं वजन बरंच कमी केलं आहे. मात्र त्याला असं पाहून चाहते चकीत झालेत. त्याने वजन कमी करण्यासाठी ओझेम्पिक इंजेक्शनचा वाप केल्याचं देखील बोललं जातंय. आता त्याच्या टीमने यामागचं सत्य सांगितलंय.