
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी ही प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. 'ठरलं तर मग' मालिकेने जुईला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. जुईने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं तर जिंकलीच सोबतच तिच्या साध्या सोज्वळ दिसण्यावरही चाहते फिदा आहेत. सध्या ती टीव्हीवरील टॉपची अभिनेत्री आहे. जुईचं अजून लग्न झालेलं नाही. त्यामुळे जुईच्या घरी लग्नासाठी अनेक मागण्या येतात. मुलांचे वडील तिच्यासाठी घरी मुलांच्या पत्रिका पाठवतात. ही गोष्ट आपल्यासाठी चांगली असल्याचं जुई म्हणालीये. सोबतच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिला कसा मुलगा हवाय याबद्दलही ती बोलली आहे.