

JUI GADKARI THARLA TAR MAG BTS
ESAKAL
जुई गडकरी प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री आहे. 'ठरलं तर मग' या मालिकेतून ती दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येते. सायली आणि अर्जुन यांची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. गेली तीन वर्ष ही मालिका टीआरपीमध्ये १ नंबर वर आहे. सध्या मालिकेत नवीन ट्वीस्ट सुरू आहे. यात सायली आणि अर्जुन यांनी आपापल्या भूमिका बदलल्या आहेत. त्यात अर्जुन सायलीचं काम पाहायला घरी थांबलाय आणि सायली अर्जुनसारखी तयार होऊन ऑफिसला जातेय. त्यांच्या या खेळाचा लवकरच अंत होणार आहे. अशातच आता जुई गडकरीने शेअर केलेला एक व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय.