
बॉलिवूड अभिनेते कबीर बेदी यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडचा एक काळ गाजवला. ते अजूनही चित्रपटात सक्रीय आहेत. मात्र कबीर आणि भारताचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी हे दोघे खूप चांगले मित्र होते हे फार कमी जणांना ठाऊक असेल. नुकतीच कबीर यांनी एक मुलाखत दिलीये. यात बोलताना त्यांनी त्यांच्या आणि राजीव यांच्या भेटीबद्दल सांगितलंय. यात नेमकं काय बोलणं झालं आणि राजीव यांचं वागणं कसं होतं याबद्दल त्यांनी भाष्य केलंय.