Kajol :'आली रे आली महाराग्नी आली' काजोलचा 'धाकड' अंदाज; भन्नाट अ‍ॅक्शन आणि बोल्ड लूक

अभिनेत्री काजोल 'महाराग्नी' या अॅक्शनपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. सिनेमाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला.
Kajol
KajolEsakal
Updated on

अभिनेत्री काजोल 'महाराग्नी क्वीन्स ऑफ क्वीन्स' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. सिनेमाचा फर्स्ट टीझर नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. काजोलचा नवरा, अभिनेता आणि निर्माता अजय देवगणने या सिनेमाचा पहिला टीझर शेअर केला. सोशल मीडियावर काजोलच्या या अ‍ॅक्शन आणि थ्रिलरने पुरेपूर असलेल्या टीझरची चर्चा रंगलीय.

भन्नाट टीझर आणि अजयचं कॅप्शन

सोशल मीडियावर शेअर केलेल्या फर्स्ट टीझरमध्ये सिनेमातील कलाकारांचा भन्नाट अंदाज पाहायला मिळतोय. हातात सिगार घेत असलेली प्रभुदेवाची एंट्री, कार रेसमधील संयुक्ताचा भन्नाट परफॉर्मन्स आणि 'पॉवर मांग के नहीं छीन के ली जाती है' म्हणत काजोलची हातात चाबूक घेऊन एंट्री आणि तिने केलेला अ‍ॅक्शन सीनने लक्ष वेधून घेतलंय.

सिनेमाच्या टीझर वरून दोन बहिणींचा एखाद्या गँगस्टर विरोधातील लढा असावा अशी गोष्ट वाटतेय. अजयने या टीझरला 'आली रे आली महाराग्नी' आली असं कॅप्शन दिलं आहे.

पहा टीझर:

काजोलच्या आगामी अ‍ॅक्शनपॅक्ड फिल्मचं अनेकांनी कमेंट्समध्ये कौतुक केलं आहे. अनेकांना हा टीझर आवडला असून बऱ्याच काळानंतर काजोलचा हा धाकड अंदाज सिनेमात पाहायला मिळणार आहे. टीझर वरून काजोल एखाद्या गँगस्टरच्या रूपात असेल असा अंदाज येतोय. E7 आणि अभिनेता, निर्माता हरमन बावेजाने या सिनेमाची निर्मिती केली आहे. चरण तेज उप्पलपती याने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

प्रभुदेवा आणि काजोल २७ वर्षांनी एकत्र

या सिनेमात काजोलबरोबर संयुक्ता, नसीरुद्दीन शाह आणि प्रभुदेवा यांच्या मुख्य भूमिका आहेत. तब्बल २७ वर्षांनंतर काजोल आणि प्रभुदेवा स्क्रीन शेअर करणार आहेत. या आधी त्यांनी तामिळ सिनेमा 'मिनसरा कनावू ' या सिनेमात एकत्र काम केलं होतं. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सिल्व्हर ज्युबिली केली होती. तर हिंदीमध्ये हा सिनेमा सपने या नावाने प्रदर्शित झाला होता.

गेल्या काही दिवसांपासून प्रभुदेवा आणि काजोल एकत्र काम करणार असल्याची चर्चा होती. पण हा टीझर प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com