
'कभी खुशी कभी गम' या चित्रपटाने ९० च्या दशकात प्रेक्षकांना वेड लावलं होतं. या चित्रपटात शाहरुख खान आणि काजल यांच्यासोबत अमिताभ बच्चन, जया बच्चन, ह्रितिक रोशन आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट हिट ठरला. नुकतंच या चित्रपटातील दोन कलाकारांचं रियुनियन झालंय. तुम्हाला या चित्रपटातील लहानगा काजलचा मुलगा आठवतोय का? त्याचं आणि काजलचं नुकतंच रियुनियन झालंय. तो लहान मुलगा काजलला तब्बल २४ वर्षांनी भेटलाय.