
बॉलिवूड अभिनेत्री काजोलने अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत आपलं स्थान टिकवून ठेवलं आहे. अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या काजोलला अभिनयाचं बाळकडू तिच्या घरातूनच मिळालंय. ती लोकप्रिय अभिनेत्री तनुजा आणि चित्रपट दिग्दर्शक शोमू मुखर्जी यांची मुलगी आहे. 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' सारख्या चित्रपटांनी तिला प्रचंड यश मिळवून दिलं. मात्र त्याकाळात रंगाने सावळी असणारी काजल अचानक गोरी दिसू लागली. ज्यामुळे तिने व्हाइटनिंग ट्रीटमेंट करून घेतल्याचं बोललं गेलं. आता काजोलने ती गोरी कशी झाली याबद्दल सांगितलं आहे.