
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री काजोल ९०च्या दशकापासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. तिने आपल्या अभिनयाने सिनेसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. काजोल कायमच तिच्या कामामुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. मात्र आता काजोल एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने तिचा पवईमधील आलिशान फ्लॅट विकलाय. आणि हे घर एका मराठी दाम्पत्याने विकत घेतलंय.