
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचीन हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. तिने स्वतःच्या हिमतीवर आणि मेहनतीने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं. तिच्या दमदार अभिनयामुळे ती अनेकांची आवडती आहे. ती कायम वेगळ्या धाटणीच्या भूमिका करताना दिसली. तिने ए जवानी है दिवानी, एक थी डायन,. मार्गारिटा विथ स्ट्रॉ अशा चित्रपटांमध्ये तिने साकारलेल्या भूमिकांचा कायम कौतुक झालं. तिने २ वर्ष दिग्दर्शक अनुराग कश्यपला डेट केलं होतं. मात्र काही वर्षातच त्यांनी घटस्फोट घेतला. आता त्यावर पहिल्यांदाच कल्कीने भाष्य केलंय.