

kamal haasan
esakal
कमल हासन भारतातील अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक मानले जातात. आपल्या कारकिर्दीत त्यांनी 'मूंद्रम पिराई', 'नायकन', 'इंडियन', 'सदमा', 'चाची ४२०', 'दशावतारम', 'विश्वरूपम', 'विक्रम' असे अनेक क्लासिक चित्रपट दिले आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असूनही, कमल हासन यांचे वैयक्तिक आयुष्य अनेकदा वादाच्या भोवऱ्यात राहिलंय. त्यांची पहिली पत्नी वाणी गणपतीसोबतचा सार्वजनिक वाद असो किंवा सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींसोबतची कथित प्रकरणं. त्यांच्या अनेक चर्चांपैकी अभिनेत्री रेखा यांच्यासोबतच्या कथित अफेअरने एकेकाळी मोठी खळबळ उडवली होती.