
मक्कल निधी मय्यम पक्षाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केलेले ज्येष्ठ अभिनेते कमल हसन आणि ज्येष्ठ पत्रकार एन. राम द्रमुकच्या मदतीने राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे. सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी द्रमुक आघाडीच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतल्यानंतर आणि स्वतः निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर, राज्यसभेतील रिकाम्या होणाऱ्या सहा जागांपैकी एक जागा कमल हसन यांना मिळण्याची शक्यता आहे.