
गेल्या आठवड्याभरात मराठी सिनेसृष्टीने दोन कलाकार गमावले. पहिले म्हणजे लोकप्रिय दिग्गज अभिनेते विवेक लागू आणि दुसरा कलाकार म्हणजे कोकणच्या मातीतला अभिनेता तुषार घाडीगावकर. अभिनेता दिग्दर्शक असलेल्या तुषार याने राहत्या घरी पंख्याला गळफास घेत आयुष्य संपवलेलं. तुषार घाडीगावकर फक्त ३४ वर्षांचा होता. त्याच्या निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. काम मिळत नसल्याने त्याने आयुष्य संपवलं असं म्हंटलं गेलं. मात्र त्याला चांगलं काम मिळत होतं. त्याचं सगळं चांगलं चाललेलं असं त्याच्या मित्रांनी सांगितलं. आता याप्रकरणात पोलिसांचा अहवाल समोर आलाय.