
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूर हिच्या पूर्वाश्रमीच्या पतीचं म्हणजेच प्रसिद्ध उद्योगपती संजय कपूर याचं सहा दिवसांपूर्वी निधन झालं. त्यांच्या मृत्यूच्या सहा दिवसांनंतरही त्यांच्या मृत्यूचं गूढ कायम आहे. मात्र अजूनही त्यांचं पार्थिव भारतात आणलेलं नाही. अंत्यसंस्काराची कोणतीही बातमी आलेली नाही. इतकंच नाही तर त्याच्या तिसऱ्या पत्नीचा म्हणजेच प्रिया सचदेव हिचादेखील पत्ता नाहीये. त्यामुळे आता नेमका त्याचा मृत्यू हा नैसर्गिक होता की घातपात होता असा प्रश्न निर्माण झालाय.