
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते. तिने अभिनेता विकी कौशलशी लग्नगाठ बांधल्यानंतर ती त्यांचे सगळे सणवार अगदी आनंदाने साजरे करताना दिसते. दिवाळी असेल किंवा करवाचौथ, सगळेच सण ती मनापासून करताना दिसते. तिचे आणि सासरच्यांचे देखील खूप छान संबंध असल्याचं दिसतं. तिचे सासू- सासऱ्यांसोबतचे अनेक फोटो कायम व्हायरल होताना दिसतात. अशातच आता कतरीना तिच्या सासूबाईंसोबत चक्क शिर्डीला पोहोचली आहे. तिचा शिर्डी संस्थानामधला एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.