
छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या प्रचंड आवडीची गोष्ट आहे. या मालिकांमधील पात्र प्रेक्षकांच्या आवडीची असतात. मात्र मालिकेतील काही पात्र ही अचानक मालिकेतून ब्रेक घेतात किंवा काही पात्र बदलली जातात. तेव्हा मात्र प्रेक्षकांना धक्का बसतो. अशाच एका अभिनेत्रीने मराठी मालिकेतून ब्रेक घेतल्याचं वृत्त आहे. ही अभिनेत्री आहे 'लग्नानंतर होईलच प्रेम' मधील काव्या म्हणजेच ज्ञानदा रामतीर्थकर. ज्ञानदाने काव्या बनून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिने यातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीये. मात्र आता ज्ञानदाने एक फोटो शेअर केलाय जो पाहून प्रेक्षक चिंतेत पडले आहेत.