

kbc 17 crorepati
esakal
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणजे केबीसी म्हणजेच 'कौन बनेगा करोडपती'. या कार्यक्रमाचा सध्या १७वा सीझन सुरू आहे. मात्र या सीझनमध्ये एक कमाल घडली आहे. केबीसी १७ ला या सीझनचा चक्क दुसरा करोडपती मिळाला आहे. अमिताभ बच्चन यांनी प्रश्न विचारल्यानंतर अवघ्या काही सेकंदात त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं. कोणतीही लाइफलाइन न वापरता त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं. टाळ्यांच्या गजरात सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलं. सोबतच त्यांच्या उत्तरावर अमिताभ इतके खुश झाले की त्यांनी उठून स्पर्धकाला मिठीच मारली.