
Zapuk Zapuk Star Cast: 'बिग बॉस मराठी ५' गाजवणारा आणि या पर्वाची ट्रॉफी आपल्या नावे करणारा लोकप्रिय रीलस्टार सुरज चव्हाण याने प्रेक्षकांना आपलंसं केलं. त्याने आपल्या वागण्याने सगळ्यांची मनं जिंकली. ६ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या महाअंतिम सोहळ्यात एकच जल्लोष करण्यात आला. त्या दिवशी मंचावर कलर्स मराठीचे प्रोग्रमिंग हेड आणि लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्याच्यासोबत चित्रपट करण्याची घोषणा केली होती. आता अखेर त्या चित्रपटाचा मुहूर्त पार पडलाय आणि या चित्रपटामध्ये कोण कोण आहे हे देखील समोर आलंय.